Advertisement

कामठी उप क्षेत्राच्या चंमुनी सर्व उपक्षेत्रिय स्पर्धकांना पराजित करून चँपियनशिप पटकाविली


कामठी उप क्षेत्राच्या चंमुनी सर्व उपक्षेत्रिय स्पर्धकांना पराजित करून चँपियनशिप पटकाविली

कन्हान : - नुकत्याच वेकोलि कोळसा खदान येथे झालेल्या आंतरउपक्षेत्रीय वेटलिफ्टिंग , पावर लिफ्टिंग , बॉडीबिल्डिंग स्पर्धा सिलेवाडा येथे संपन्न झाली . या स्पर्धेत कामठी उपक्षेत्राच्या चंमुनी सर्व उपक्षेत्रीय स्पर्धकांना पराजित करून चँपियनशिप पटकाविली . यात १) रविंद्र सिंग यानी स्ट्रांग मैन नागपुर क्षेत्राचे पदक , २) कुणाल वानखेडे ने बॉडीबिल्डिंग मध्ये प्रथम क्रमांक , वेटलिफ्टिंग मध्ये व्दितीय आणि पावर लिफ्टिंग मध्ये व्दितीय क्रमांक , ३) गुलजार सिंह वेटलिफ्टिंग प्रथम क्रमांक , ४) सुमित शर्मा बॉडीबिल्डिंग मध्ये व्दितीय , ५) श्यामू कैथल वेटलिफ्टिंग प्रथम क्रमांक व पावर लिफ्टिंग मध्ये व्दितीय क्रमांक , ६) राजु खोब्रागडे वेटलिफ्टिंग मध्ये व्दितीय क्रमांक , ७) मोहन सिंह वेटलिफ्टिंग मध्ये प्रथम क्रमांक तर पावर लिफ्टिंग मध्ये व्दितीय क्रमांक , ८) प्रमोद सूर्यवंशी पावरलिफ्टिंग मध्ये प्रथम क्रमांक आणि महिला मध्ये ९) पूजा पांडे पावरलिफ्टिंग प्रथम क्रमांक , १०) कविता सिंह पावरलिफ्टिंग मध्ये व्दितीय क्रमांक , ११) शारदा शिंदे पावर लिफ्टिंग व्दितीय क्रमांक , १३) राखी किटचरे पावरलिफ्टिंग मध्ये प्रथम क्रमाक आणि गोंडेगाव उपक्षेत्राचे अंगद सिंह वेटलिफ्टिंग मध्ये प्रथम क्रमांक व पावरलिफ्टिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला . 


या अगोदर इंडिया चँपियन राहिलेले मनोज प्रसाद मार्गदर्शक यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले . या सर्वांचे श्रेय कन्हान शहरात असलेली विर जिम चे संचालक विलास घारपिंडे यांची गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू आहे .

 घारपिंडे दरवर्षी आपल्या जिम मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी युवकांना मदत व मार्गदर्शन सहकार्य करतात . त्यामुळे युवक वर्ग नेहमी पारीतोशिक घेऊन बाजी मारतात . त्यामुळे विरजिम युवकांसाठी पसंती असून युवकांनी अभिनंदन केले . विर जिमच्या संचालक विलास घारपिंडे   जिमचे  सर्व सहकारी लोकांनी विनर युवकांचे स्वागत केले . सर्व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या